वृध्द व्यक्ती दृष्टी अभावी जागेवरच बसून असतात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सचिन साखला यांनी राजकारणाविरहीत समाजकार्य काय असते याची प्रचिती प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून दाखवून दिले. साखला यांच्या वाढदिवसानिमीत्त अनेकांना दृष्टी देऊन खर्या अर्थाने समाजकार्य काय असते हे दाखवून दिले, समाजाला एक नवी दिशाही दिली, त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. असे जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सांगितले. सचिन साखला यांनी आपल्या वाढदिवसानिमीत्त कोणताही झगमगाट न करता मोतीबिंदू हटाव या संकल्पनेतून साजरा केला. अहमदनगर येथील आनंदॠषी हॉस्पिटल व कुंदनकाका साखला मित्र परिवार, उज्वल ग्रुप यांच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू हटाव मोहीम हाती घेऊन वृध्द व्यक्तींना उतारवयात पुन्हा दृष्टी मिळवून देण्याची संकल्पना करुन प्रत्येक महिण्याच्या 6 तारखेला अळकुटी येथे भव्य नेत्रशिबीराचे आयोजन केले आहे. यामध्ये डोळयांची तपासणी करुन उपचार केले जातील. त्यासाठी कोणत्याही स्वरुपाचा मोबदला घेतला जात नाही. साखला यांना सामाजिक प्रेरणा त्यांचे वडील पारनेर तालुका जैन संघाचे अध्यक्ष, पा. ता. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कुंदनकाका साखला यांच्या प्रेरणेतून मिळत असुन, त्यांचा वाढदिवस दरवर्षी ते सामाजिक उपक्रमातून साजरा करतात. यामध्ये ऊस तोड कामगारांना, त्यांच्या मुलांना ऊबदार कपडे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना खाऊ व वह्या, पुस्तके वाटप करतात. त्यांच्या या उपक्रमाबद्दल जि. प. उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे यांनी सत्कार करुन त्यांचे कौतुक केले. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष मधुकर उचाळे, पा. कृ. बा. समिती सभापती प्रशांत गायकवाड, प्रसन्ना उद्योग समुहाचे चेअरमन किरण डेरे, दादासाहेब पठारे, गंगाराम बेलकर, अरुण ठाणगे, बापुसाहेब भापकर, संतोष काटे, विजय आवारी, बाळासाहेब पुंडे, गणेश जाधव, विलास शेंडकर, संतोष शेंडकर, नाना मावळे, बाळासाहेब पंडीत, तुकाराम कवडे, बाळासाहेब कवडे, किसन कवडे, शिवाजी कवडे, अर्जुन डेरे, आयुब शेख, रामचंद्र थोरात, किशोर कड, उध्दव चौधरी, अंकुश म्हस्के, शरद गायकवाड, अमित बांडे, जावेद कुरेशी, दत्ता रोकडे, भास्कर उचाळे, संतोष शिनारे, पावडे गुरुजी, गिरीष साखला, सागर कवडे, मच्छिंद्र उचाळे, गुंडा भोसले, प्रफुल्ल शिरोळे, आनंद नरसाळे, मल्हारी शिनारे, पंढरीनाथ शिनारे, गणेश खामकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सचिन साखला यांच्या माध्यमातून अनेकांना दृष्टी ः सुजित झावरे
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:20
Rating: 5