Breaking News

चैतन्य नवनाथ पारायण सोहळा ; कथेचा समारोप


काल्याच्या किर्तनाने हरिनाम सप्ताह, चैतन्य नवनाथ पारायण सोहळा व कथेचा समारोप झाला. शहरातील या सप्ताहास विस वर्षे पूर्ण झाले आहेत, नेवासा येथील कानिफनाथ मळा येथे सालाबाद प्रमाणे हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते, चैतन्य नवनाथ पारायण सोहळा व नवनाथ कथेचे आयोजन दि 10 ते 19 जानेवारी या कालावधीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी महंत सुनीलगिरी महाराज यांचे हस्ते कलश पुजन व ह.भ.प शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ह. भ. प. खुळे महाराज नारायण महाराज नजन मा. आ. पांडुरंग अभंग नागेबाबा मल्टीस्टेटचे चेअरमन कडुभाऊ काळे हे मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याच्या कालावधीत पहाटे चार ते सहा काकडा सकाळी 7 ते 11 सामुदायिक नवनाथ ग्रंथ पारायण सायं. 5 ते 6 हरिपाठ, रात्री 6 ते 8 किर्तन व तद्नंतर जागर भारूडाचा कार्यक्रम असा दैनंदिन कार्यक्रमाचा समावेश होता. सप्ताह काळात श्री नवनाथ कथेचे निरूपण शरद महाराज काटकर यांनी केले. बुधवारी सायंकाळी सजवलेल्या रथातून तुकाराम महाराज मंदिर हनुमान मंदिर मोहिनीराज मंदिर नगर पंचायत चौक मार्गे श्री चैतन्य कानिफनाथांच्या प्रतिमेची व ध्वजाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. गुरुवारी सकाळी 9 :30 ते 11:30 या वेळेत ह.भ.प प्रदिप महाराज सायंकर यांच्या काल्याचे कीर्तन झाले. तद्नंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.