सोनईत कडकडीत बंद
भीमा कोरेगाव येथील घटनेचा सोनई परिसरातून तीव्र निषेध करण्यात आला. बुधवारी महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर विविध दलित संघटनांनी सोनई बंद ठेऊन निषेध करण्याचे आवाहन केले होते. सोनई परिसरातील व्यावसायिकांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपापले व्यवसाय बंद ठेवले. बंदच्या दरम्यान भीमसैनिकांनी गावातून फेरी काढून शांततेत या घटनेचा निषेध केला. ही फेरी आंबेडकर चौकात आल्यावर तिथे निषेध सभा घेण्यात आली. यावेळी उदय कर्डक, विजय जगताप, रवी आल्हाट यांची भाषणे झाली. या निषेध मोर्चा व सभेचे नेतृत्व बाळासाहेब साळवे, सनी साळवे, दादासाहेब वैरागर यांनी केले. यावेळी संदीप कुसळकर, विठ्ठल वैरागर, अवि वैरागर, प्रमोद वैरागर, किशोर मगर, बाबासाहेब जगताप, विशाल जगधने, राहुल वाघमारे, कृष्णा शिंदे, राजू गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, बाजीराव भालेराव, शैलेश गायकवाड, सचिन गायकवाड, सुरज काकडे, विकास साळवे, अमोल कर्डक, सुरज साळवे, सचिन वैरागर, रवी साळवे, मोहन शेगर, नंदू वैरागर, आदींसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
