Breaking News

बंदला हिंसक वळण


जवळा/ प्रतिनिधी/- भीमा-कोरेगाव प्रकरणी जवळा गावात बुधवार,३ जानेवारी२०१८ च्या सकाळ पासून कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र पाळलेल्‍या बंदला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास करमाळा-जामखेड बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडण्यात आल्या. मात्र, चालक आणि वाहकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. बस चालकाच्या हाताला किरकोळ जखम झाली.

या बसमध्ये सकाळी शाळेत जाणरे विद्यार्थी आणि इतर प्रवाशी होते . चालकाने बस न थांबवता पुढे नेल्‍यामुळे बसमधील कोणाला काही इजा झाली नाही. आंदोलक एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी क्रांती ज्योती दूध संघात शिरून क्रांती ज्योती दूध संघाच्या काचा फोडून दूध ओतून दिले. दूध संघाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या घटनेची माहीती मिळताच पोलिस यादव व चव्हाण घटनास्थळी दाखल झाले.सकाळपासून बाजार पेठ बससेवा शाळा,कॉलेज,विद्यालय बंद ठेवण्यात आले.