Breaking News

मिरजगाव मध्ये सावित्री बाई फुले जयंती साजरी

मिरजगाव /प्रतिनिधी / - कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी चिमुकल्या बाळगोपाळानी विशिष्ट पद्धतीने वेशभुषा करून मान्यवरांचे मने जिकंली. 


मिरजगाव येथील जिल्हा परीषद मराठी मुले शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती सावित्रीबाई फुले, व ज्योतिबा फुले यांची वेशभुषा करून गावामधुन सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली होती. त्यानंतर पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत बुध्दिंवत, भाजपा जेष्ठ नेते हरिदास केदारी, मिरजगाव शिवसेना शहर अध्यक्ष संजय शेलार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब वाडगे, केंन्द्र प्रमुख शिंदे , मुख्याध्यापक रविन्द्र शिंदे, वनिता जगताप, व प्रविण सरोदे, यांनी विशेष परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविन्द्र शिंदे यांनी तर आभार वनिता जगताप यांनी मानले.