भारत-पाकमध्ये अणुकेंद्राच्या यादीची अदलाबदल .
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्ताननेतीन दशके जुन्या द्विपक्षीय कराराअंतर्गत सोमवारी नवी दिल्ली आणि इस्लामाबादमध्ये आपापल्या मुत्सद्यांच्या माध्यमातून अणुकेंद्रांच्या यादीची अदला-बदली केली. अणुकेंद्रावरील हल्ले रोखण्यासाठी झालेल्या करारानुसार यादीची अदलाबदल करण्यात आली.
३१ डिसेंबर १९८८ मध्ये यासंबंधीच्या करारावर स्वाक्षरी झाली होती. तर १९९१ पासून या कराची अंमलबजावणी सुरू झाली होती. या करारानुसार दोन्ही देश प्रत्येक वर्षी १ जानेवारीला एकमेकांच्या अणुकेंद्रांच्या माहितीची अदलाबदल करतात. दोन्ही देशांमध्ये सलग २७ वेळेस हा कार्यक्रम पार पडला. १९९२ मध्ये पहिल्यांदाच यादी एकमेकांना सोपविण्यात आली होती. .