Breaking News

12 नव्या मार्गांवर पीएमपीएमएलची बस सेवा


पुणे, - महानगर परिवहन महामंडळ अर्थात पीएमपीएमएलने उद्या 1 जानेवारीपासून पुणेकरांना अधिक लोकाभिमुख सेवा देण्याचा निश्‍चय केला आहे. एक जानेवारीपासून पुण्यात पीएमपीएमएल 12 नव्या मार्गांवर बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. तसेच जुन्या 100 बस स्क्रॅप करण्यात येणार असून नव्या 200 मिनी बसच्या माध्यमातून पुणे शहरातील अरुंद असलेल्या रस्त्यांवरही परिवहन सेवा पुरविली जाणार आहे.
पीएमपीएमएलचे सध्या 1436 शेड्युल सुरू होते. ते वाढवून 1810 शेड्युल करण्यात आले आहे. या 1810 शेड्युलच्या माध्यमातून तीन हजार बसफेर्‍या केल्या जाणार आहेत. तसेच बीआरटी लेनमध्ये शिरुन वाहन चालविणार्‍याचे वाहन जप्त करुन लिलाव करण्यात येतील, अशी माहिती पीएमपीएमएलचे मुख्य संचालक तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.