Breaking News

प्रवरा डिप्लोमा फार्मसी सिन्नर आणि गोखले ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये सामंजस्य करार


प्रवरानगर प्रतिनिधी :- लोणी येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी डिप्लोमा, चिंचोली तालुका सिन्नर आणि गोखले अडवान्स्ड ट्रेनिंग इंस्टिट्यूट, जळगाव यांच्यावतीने नुकताच पाच वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आला, अशी माहिती प्राचार्य डॉ. विजय तांबे यांनी दिली. ते म्हणाले, की महाविद्यालयात विद्यार्थीहित लक्षात घेऊन फार्मसी डिप्लोमामध्ये विविध उपक्रम राबविले जातात. कलागुणांना वाव मिळावा, यासाठी विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धामध्ये नेहमी भाग घेतात. या सामंजस्य करारामुळे विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, मुलाखत प्रशिक्षण, उद्योजक विकास कार्यशाळा आदी बाबी विद्यार्थ्यांना शिकायला मिळणार आहेत. या करारप्रसंगी गोखले अडवान्स्ड ट्रेनिंग इंस्टिट्युटचे संचालक देवदत्त गोखले, व्यवस्थापक रोहित पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय तांबे, शिक्षक राहुल खैरे, धीरज चेचरे, मयूर भोसले, सुप्रिया शिंदे आदी उपस्थित होते.