Breaking News

आ. बाळासाहेब थोरातांना घेराव घालणारे पोलिसांच्या ताब्यात.


संगमनेर/प्रतिनिधी :- प्रजासत्ताकदिनी आ. बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हाणून पाडला. भाऊसाहेब थोरात कारखान्याने शेतकऱ्यांना उसाची पहिली उचल २ हजार ५५० रुपये द्यावी, या मागणीसाठी शेतकरी नेते दशरथ सावंत यांच्या नेतृत्वाखाली दि.२३ पासून शेतकरी सभासदांनी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरु केले. आंदोलकांनी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या राजीनाम्याची मागणी करत बैठा सत्याग्रह व उपोषण केले. दशरथ सावंत, शरद नाना थोरात, जनार्दन आहेर, दीपक वाळे, डॉ. अरुण इथापे, अशोक सातपुते, रमेश उर्फ श्याम कासार, संतोष रोहम, आबासाहेब गायकवाड आदींसह अनेक आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर सोडून दिले.