नाशिक :- २०१३ साली संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या ऑनर किलिंगच्या प्रकारातून झालेल्या सोनई तिहेरी हत्याकांड खटल्यात आज सहा आरोपीना मरेपर्यंन्त फाशीची शिक्षा सुनावली.गेल्या आठवड्यात नाशिक सेशन्स कोर्टानं ७ पैकी ६ आरोपींना दोषी ठरवलं होतं, तर एक आरोपी निर्दोष सुटला होता. २०१३च्या जानेवारी महिन्यात नेवासा फाटा इथं ३ तरुणांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती.
सोनई तिहेरी हत्याकांडांतले आरोपी - प्रकाश दरंदले - दोषी - रमेश दरंदले - दोषी - पोपट दरंदले - दोषी - गणेश दरंदले - दोषी - अशोक नवगिरे - दोषी - संदीप कुऱ्हे - दोषी - अशोक फलके - निर्दोष
सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी सहा आरोपीना मरेपर्यंन्त फाशी !
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:50
Rating: 5