Breaking News

मनपा व नगरपालिका क्षेत्रातील शिक्षकांना गट विमा योजना लागू करण्यासंदर्भात शासन सकारात्मक - डॉ. रणजित पाटील

                      

राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांच्या शिक्षण विभागात केंद्रप्रमुख पद निर्माण करणे व या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना गट विमा योजना व कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असल्याचे नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी येथे सांगितले.
महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्यासंदर्भात मंत्रालयात राज्यमंत्री डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी शिक्षक संघटनेचे उदय शिंदे, सुधाकर सावंत, शफिक सय्यद, भाई चव्हाण, विठ्ठल नागरे, राजेंद्र घोडके आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले, महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देणे, पूर्णवेळ प्रशासन अधिकारी नेमणे, रिक्त पदे भरणे आदी मागण्यासंदर्भात राज्य शासन योग्य तो निर्णय घेईल. तसेच या क्षेत्रातील शाळांना वीज बिल, पाणी बिल व इतर कर हे घरगुती दराने मिळण्यासंदर्भातही पाठपुरावा करण्यात येईल.