Breaking News

देवबाग येथे तरुणाची आत्महत्या


सिंधुदुर्गनगरी, दि. 20, जानेवारी - मालवण तालुक्यात देवबाग भाटकरवाडी येथील हर्षद भाटकर याने आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. हर्षद भाटकर आपल्या आईसोबत राहत होता. दुबई येथे कामास असणारा हर्षद सहा महिन्यांपूर्वी गावी आला होता. सध्या देवबागमध्ये तो गवंडीकाम करत असे. त्याची आई क ामानिमित्त बाहेर गेली असताना घरात कोणी नसल्याचे पाहून हर्षद याने घरातील सिलिंग फॅनला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्याशी संपर्क होत नव्हता म्हणून मित्र व आई त्याला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते मात्र बराच काळ मोबाईल कॉल रिसिव्ह केला जात नसल्यामुळे त्याच्या आईने सायंकाळी घरी जाऊन पाहिले असता हर्षद याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी मालवण पोलिसांना माहिती दिल्यावर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि पुढील कारवाईस सुरुवात केली.