कचरा डम्पिंग ग्राउंडने टाकली कात
सावंतवाडी नगरपालिकेच डंपिंग ग्राउंड सध्या क्रिकेटच मैदान बनलय. एकवेळ जे डंपिंग ग्राउंड दुर्गंधीचं साम्राज्य बनले होत त्या डम्पिंग ग्राउंडचा एक वेगळा आकर्षक लूक निर्माण झाला आहे. आकर्षक बांधकाम आणि संरक्षक कंपाउंड घालून पूर्ण डंपिंग ग्राउंड स्वच्छ आणि सुंदर बनवल आहे. नगराध्यक्ष बबन साळगावकर, मुख्यधिकारी डॉ. विजय कु मार द्वासे तसेच सर्व नगरसेवक कर्मचारी यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. ज्याठिकाणी फक्त कचरा टाकला जायचा तिथे क्रिकेट स्पर्धा सुद्धा घेण्यात आली. सावंतवडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, मुख्यध्याकारी डॉ. विजयकुमार द्वासे वसे सर्व नगरसेवक, नगरपालिका कर्मचारी आणि शहरातील नागरिक याच्या प्रयत्नान सावंतवाडी शहरात स्वच्छतेच एक रोल मॉडेल यातून उभ राहील आहे. त्याच प्रमाणे शासनच्या स्वच्छह भारत अभियान स्पर्धेत सुद्धा या कात टाकलेल्या डम्पिंग ग्राउंडने चांगल योगदान दिल आहे. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्वच्छतेचे असे अनेक उपक्रम सावंतवाडी शहरात राबविले आहेत, त्यामुळे सुंदरवाडीच्या सौंदर्यात अधिकच भर पडत आहे.
