Breaking News

नारोशंकर मंदिरानजीक आगीत आठ दुकाने जळून खाक


नाशिक, दि. 20, जानेवारी - नाशिकच्या प्रसिद्ध नारोशंकर मंक येेे थेआज पहाटेच्या सुमारास आग लागून परिसरातील आठ दुकानांची राखरांगोळी झाली. या आगीत रामसेतू पूलजवळच्या हळदी कुंकवाचे साहित्य, झाडू, कटलरी, खेळणीची दुकाने जळून खाक झाली आहेत. यात लाखो रुपयांच्या मालाची राख झाली. आगीची माहिती मिळताच पंचवटी विभागातील अग्निशमन विभागातील बंब आग आटोक्यात आणण्यासाठी रवाना करण्यात आले होते. शर्थीचे प्रयत्न करून दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.दरम्यान, अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास आग लावल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे.