Breaking News

महागाई विरोधात शिवसेनेचा नाशिकच्या द्वारका परिसरात रास्ता रोको

नाशिक, दि. 28, जानेवारी - पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती आणि वाढत जाणारी महागाई हे मुद्दे घेऊन आज नाशिक शहर शिवसेनेतर्फे नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरात सकाळी रास्तारोको करण्यात आला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आ. योगेश घोलप, विजय करंजकर, अजय बोरस्ते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 


ऐन सकाळी लोकांना कामावर जाण्याच्या गर्दीत रास्ता रोको झाल्याने या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आणि वाहनांच्या रांगा लागल्या. मात्र पोलिसांनी वेळीच दखल घेऊन वाहतूक अन्यत्र वळविल्याने वाहतुक कोंडी टळली. पाऊण तासांनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. यावेळी आंदोलकांनी गळ्यात गाजराच्या माळा गळ्यात घातल्या होत्या. तसेच यावेळी सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली.