वरूर /प्रतिनिधी । ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामीण विकास सोसायटीचे माजी चेअरमन शमशेर पठान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आहे, त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरूर येथे निवृत्त शिक्षक म्हस्के गुरूजी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, पांडुरंग माध्यमिक विद्यालयामध्ये माजी सरपंच मधुकर नाना वावरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, विद्यालयातील विद्यार्थिनी प्रियंका गारपगारे हिला सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी हा किताब मिळाला, तसेच यावर्षी पांडुरंग माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दोन्ही शाळेचे विद्यार्थी तालुकास्तरावर पार पडलेल्या विविध प्रकारच्या स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरावर निवड झाली, पांडुरंग माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी अमृता हरवणे व गायत्री चव्हाण यांचा सत्कार नवनिर्वाचित सरपंच मनिषा भागवत लव्हाट यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Reviewed by Dainik Lokmanthan
on
16:30
Rating: 5