रानटी जनावरांमुळे शेतीचे नुकसान; शेतकरी संतप्त
सोनुर्लीत माकड, गवेरेडे, बिबटया यांच्या हल्लामुळे शेतीत शेतकर्याना फिरणसुद्धा धोक्याचे बनले आहे. हंगामी भात शेतीची नासधूस सुरू आहे. शासन स्तरावरुन नुकसान भरपाईची फक्त गाजर दाखवण्याचे प्रकार सुरु आहेत. शेतकर्यानी कर्ज काढून शेती केली आहे. पण वन्यप्राणी शेतीच नुकसान करत असल्याने कर्जफेड अशी करायची असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा आहे. यामुळे हंगामी पावसाळी भातशेती मात्र धोक्यात आली आहे. जिल्ह्यात नदी पात्रात मगरींचे प्रमाण वाढत आहे. या मगरी गुराढोरांवर आणि शेतकर्यांवर हल्ले करत आहेत. यात सुद्धा नुकसान होत आहे. एकंदरीतच जंगलचा भाग कमी होऊन होत असलेले शहरीकरण सुद्धा याला काही प्रमाणात जबाबदार आहेत. प्राणी मानवी वस्तीत घुसू लागलेत, पण याचा मोठा तोटा ग्रामीण भागातल्या शेतकर्याना सहन करावा लागत आहेत. वनविभागाने यात लक्ष घालून बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.