Breaking News

रस्तापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय अंबाडे बिनविरोध


चांदा/प्रतिनिधी/- नेवासा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाची समजल्या जाणाऱ्या रस्तापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय रामभाऊ अंबाडे यांची निवड झाली.
रस्तापूर ग्रामपंचायतची मागील महिन्यात निवडणूक झाली. उपसरपंचपदी संजय रामभाऊ अंबाडे यांची बिनविरोध निवड झाली. ही निवड विद्यमान सरपंच वसंत राव उकिरडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यानिवडी प्रसंगी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते. संजय अंबाडे हे अरुण सावंत यांच्या पाणलमधून निवडून आलेले आहेत. उपसरपंचपदी संजय अंबाडे यांची निवड झाल्याबद्दल अनेक ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले