Breaking News

वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन


श्रीगोंदा/प्रतिनिधी/- महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दि. ३१/०१/२०१८ रोजी सकाळी १०. ०० वा. आयोजित केला आहे . 
या संमारंभाचे अध्यक्षस्थान माजी आदिवासी विकास मंत्री मा. बबनराव पाचपुते भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून अंतर्नाद मासिकाचे संपादक व सुप्रसिद्ध लेखक मा. भानू काळे(पुणे) हे विचार व्यक्त करणार आहेत. या समारंभाला मा. आमदार राहुल जगताप. मा.बाबासाहेब भोस, मा.प्रकाशशेठ पटवा, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी दिली.