Breaking News

प्रसन्ना कांदा मार्केट मध्ये प्रचंड कांद्याची आवक


अळकुटी /प्रतिनिधी /- पारनेर तालुक्यातील पाडळी आळे येथील प्रसन्ना कांदा मार्केट मध्ये प्रचंड कांद्याची आवक झाली आहे. सोमवार ,२९ जानेवारीला १८२५७ गोणी आवक झाल्याने प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या कांदयाला विक्रीचा योग्य मोबदला मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
पारनेर तालुक्यातील पाडळीआळे येथे २ वर्षांपूर्वी देशातले पाहिले खाजगी मार्केट व दक्षिण महाराष्ट्रातील पाहिले कांदा मार्केट प्रगतशील शेतकरी बाळशीराम ढेरे यांचे थोरले पुत्र प्रसन्ना उद्योग समूह चे चेअरमन किरणशेठ डेरे व त्यांचे मित्र विकासशेठ गांधी यांनी खाजगी कांदा मार्केट सुरु केले. तालुक्यातील व तसेच जुन्नर , शिरूर , श्रीगोंदा , राहुरी , संगमनेर, या भागातील शेतकरी आपला माल या मार्केट मध्ये विक्रीसाठी घेऊन येतात. त्यामुळे या मार्केट मध्ये वर्षभर आवक सुरु राहते. विश्वास व पारदर्शकता यामुळे शेतकऱ्यांना हे मार्केट आपलेच वाटते आहे. 

सोमवार ला मार्केट मध्ये १८२५७ कांद्याची आवक झाली. यामध्ये एक नंबर कांद्याला २२१/-रुपये तर दोन नंबर कांदयाला १८०/-रुपये याप्रमाणे भाव मिळाला. प्रचंड आवक असून देखील योग्य भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.