Breaking News

सोनईत हळदी-कुंकवाचा कार्यक्रम


सोनई/प्रतिनिधी /-मकरसंक्रांत निमित्त पेठेतील माऊली भजनी महिला मंडळाने गणेश मंदिरात तर जगदंबा महिला मंडळाच्या वतीने हलवाई गल्लीत हळदी-कुंकू व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम मोठ्या आनंदात पार पडला.यात प्रामुख्याने जेष्ठ साहित्यिक मा. यशवंतराव गडाख यांच्या अमृत महोत्सव निमित्ताने माऊली महिला मंडळाने 275 आवळा झाडाचे वाण म्हणून वाटप करण्यात आले. तसेच जगदंबा महिला मंडळाने संसार उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मंगल बंग, विद्या जोगदे, अनिता खंडागळे, प्रतिभा जोशी, संध्या जोशी, दीपा दायमा, शोभा दरंदरले, संगिता लोया, रूपा हलाल, अर्चना खंडागळे, जयश्री खंडागळे, आरती बडे, लीना हलाल, रूपा शाह, सुवर्णा बंब, शोभा हारडे, प्रियंका शाह, अलका सुरसे, निर्मला क्षीरसागर, सुनंदा शाह,जया शहा आदी महिला मोठ्या संखेने उउपस्तीत होत्या. आभार अनिता खंडागळे यांनी मानले.