Breaking News

राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स चॅम्पिअनशिप स्पर्धेत यजमान महाराष्ट्राने खाते उघडले

रत्नागिरी, दि. 20, जानेवारी - डेरवण (ता. चिपळूण) येथील एसव्हीजेसीटीच्या मैदानावर सुरू असलेल्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स चॅम्पिअनशिप स्पर्धेत यजमान महाराष्ट्राने मुलींच्या गटात 100 मीटर धावण्यात सुवर्ण पदकाची कमाई करत खाते उघडले, तर दिल्लीने दोन सुवर्ण पदके पटकावली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांमध्ये अवघ्या एका सेकंदाचा फरक नोंदविला गेला. दुस-या दिवशी सहा क्रीडा प्रकारांचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत.


देशभरातील 44 संघांचा सहभाग असलेल्या खेळाडूंचा कस लागणार्‍या राष्ट्रीय स्तरावरील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण, रौप्य, कास्य पदकांसाठी अत्यंत चुरस सुरु झाली आहे. प हिल्या दिवशी प्राथमिक फे-यांमध्ये पात्र ठरलेल्या खेळाडूंचे अंतिम सामने आज सकाळपासून सुरू झाले. यामध्ये यजमान महाराष्ट्रसह दिल्ली, बिहारच्या खेळाडूंनी बाजी मारली आहे.