सोलापूर, दि. 20, जानेवारी - शहरासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्याबाबत रात्री नऊ पर्यंत निर्णय झाला नव्हता. मात्र, पाणी सोडण्याची तयारी पूर्ण झाले आहे. शहरासाठी पाणी सोडावे या मागणीचे निवेदन बसपाचे नगसेवकांनी उजनी लाभक्षेत्राचे अधिक्षक अभियंता शिवाजी चौगुले यांना देण्यात आले. शहरासाठी पाणी सोडावे अशी मागणी महापालिकेने केली आहे. याबाबत पुन्हा सिंचन विभागास पत्र दिले. पाणी नाही सोडल्यास सोमवारपासून शहरात पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना विचारले असता, पाणी सोडतील, असे सांगितले.
उजनीतून पाणी सोडण्याची तयारी पूर्ण
Reviewed by Dainik Lokmanthan
on
16:00
Rating: 5