आसामच्या अधिका-याचा नागपुरात मृत्यू
नागपूर, दि. 20, जानेवारी - नागपुरातील नॅशनल सिव्हील डिफेन्स कॉलेज (एनसीडीसी) येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या आसाममधील एका अधिकार्याचा मृत्यू झाला. कुमुद नाथ असे त्यांचे नाव आहे. ते आसाममधील तेजपूरचे रहिवासी आहेत.
यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार नागपुरातील एनसीडीसी येथे देशभरातील अधिका-यांचा प्रशिक्षणवर्ग सुरू आहे. आसामच्या तेजपूर येथून प्रशिक्षणासाठी आलेले कुमुद नाथ यांची 17 जानेवारी रोजी संध्याकाळी अचानक प्रकृती खालावली. त्यांना अंबाझरी पोलीस ठाण्याजवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत असताना संध्याकाळी 6.25 वाजता त्यांचा मृत्यू झाला. प्रारंभी या प्रकरणाची नोंद अंबाझरी ठाण्यात करण्यात आली. नंतर तपासासाठी ती केसडायरी सीताबर्डी ठाण्यात पाठविण्यात आली. कुमुद नाथ यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असावा, असा अंदाज आहे.