मकर संक्रांतीच्या स्नेहमिलनात शिक्षकांचा सत्कार
तीळगुळाने वाढविला शैक्षणिक सहलीचा गोडवा. मकर संक्रांतीचे औचित्य साधून राहाता येथील साध्वी प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकूलच्या इंग्लिश मिडीयम स्कूलची शैक्षणिक सहल रविवारी कुकाणा मार्गे तीर्थक्षेत्र पैठण येथे आयोजित केली असता, यावेळी कुकाणा येथील पालकांनी मोठ्या उत्साहात या सहलीचे स्वागत केले. या शैक्षणिक सहलीमध्ये सहभागी झालेले शिक्षक सचिन गिते, अशोक गाढवे, जालिदंर घनवटे, रविकिरण पाटील, अंरविद पवार, मनोज शिंदे, प्राचार्य श्रीसन मेनकद, अदिनाथ मुनमूने, अविनाश अनाप, विकास हारदे, बाळासाहेब कासार, संतोष ससे, संकाजी अभाळे, यांचा श्रीफळ व गुलाब पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी दिशा इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य संदीप खाटीक, युवा नेते सुनिल कर्डीले, कराटे प्रशिक्षक निलेश काळे, मुळा पाटबंधारे विभागातील सेवा निवृत्त आप्पासाहेब खाटीक व बाबासाहेब बोरसे आदि पालक उपस्थित होते.
