Breaking News

निशुल्क योग शिबीराची उत्साहात सांगता


नेवासाफाटा/प्रतिनिधी/-जिल्हा पतंजली योग समितीच्या वतीने नेवासाफाटा येथे घेण्यात आलेल्या योग शिबीराच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त निशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराची उत्साहात सांगता झाली

नेवासाफाटा येथील यश मंगल कार्यालयामध्ये एक वर्ष योग शिबिराला झाल्यामुळे निशुल्क योग शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उदघाटन माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.आशाताई मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हा पतंजली योग समितीचे मधुकर निकम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

यावेळी बोलताना आशाताई मुरकुटे म्हणाल्या की, तालुक्यात गावागावात योग शिबिरे आयोजित केल्यास मी सहकार्य करीन,पुढील महिन्यात देवगड येथे ही शिबिराचे आयोजन केले असून, त्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले

योगशिक्षक मोहिनीराज उर्फ बाळ जाधव, सिमाताई फुलारी, मनीष म्हस्के, पी.आर.जाधव, भिवाजीराव आघाव, डॉ.मुकुंद हारदे, विजय गाडे, पत्रकार बाळासाहेब देवखिळे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष रमेशभाऊ सावंत नगर येथील योग समितीच्या कल्पनाताई ठोकळ, राजश्री मिसाळ, ज्योत्स्ना महाजन, आशाताई तांदळे, ज्योती शिरसाठ, लोखंडे, विजय चौधरी, प्रदीप राजगिरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोतकर, डॉ.बर्डे, ससे, साधना चौधरी, सुचिता अंबुले, ससाणे, प्रकाश पाटील, कु.प्रज्ञा देवखिळे, वरद निकम यांनी विशेष प्रयत्न केले