पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली दागिण्यांवरील ‘संक्रांत’
मकरसक्रांतीला देवीच्या मंदीरात पूजेसाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील पाच तोळे सोने धूमस्टाईलने ओरबाडून नेल्याची घटना कारखाना परिसरातील वैष्णवी चौकात घडली होती. येथील वैष्णवी चौकातील देवीच्या मंदीरात महीला भगीनी सुगडेपूजन करण्यास पूजेसाठी आल्या असता मोनिका धनंजय विटनोर आणि पुरुषोत्तमनगर परिसरात सुनिता अशोक खळेकर या महिलांच्या गळ्यातील प्रत्येकी पाच तोळ्याचे गंठण अज्ञात चोरटयांनी ओरबाडून नेले. राहुरीचे पो. नि. प्रमोद वाघ यांनी तपासाची चक्रे हलवत पोलिस कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. आरोपींचा कसून शोध घेतला. या सर्च ऑपरेशनमध्ये पोलिसांनी विनोद (उर्फ खंग्या) विजय चव्हाण, अनुप गोंडाजी चव्हाण या दोघांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्हा केल्याची कबुली दिली.
या कारवाईत पो. नि. प्रमोद वाघ, पोलिस उपविभागीय कार्यालयातील पो. ना. शरद आहिरे, देवळाली प्रवराचे स.फौ. अनिल गायकवाड, स. फौ. अर्जुन कोरडे, दिनेश आव्हाड, संतोष राठोड, देविदास राठोड, विजय वाघस्कर, ज्ञानेश्वर पथवे,बंडू बहिर, अनिल पवार, अय्युब शेख, गुलाब मोरे, महेश भवर, गौतम लगड, महिला पोलिस कविता पैठणकर, राधिका कोहकडे आदींनी सहभाग घेतला.
