Breaking News

पाठय पुस्तकातील लेखक कवींनी साधला विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद.


शेवगाव /प्रतिनिधी / - पाठय पुस्तकातील लेखक कवीं कसे असतात. ते कसे दिसतात . असा प्रश्न सर्वसामान्य विदयार्थी वर्गांना हमखास पडत असतो. पाठय पुस्तकातील लेखक कवींशी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद करण्याची संधी विदयार्थ्यांना मिळाली. लेखक -कवींशी साधला विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद.दहावीच्या पुस्तकात 'मल्हारची धून' ही कविता असणाऱ्या कवयित्री डॉ. संगीता बर्वे, सातवीच्या सुलभ भारतीय मध्ये 'नाते जगाशी' ही कविता असणाऱ्या कवयित्री आश्लेषा महाजन, सातवीच्या पुस्तकात 'माणूसपण गारठलंय' ही कविता असणारे कवी प्रा. शशिकांत शिंदे, तिसरीच्या सुलभ भारती मध्ये 'झोका' ही कविता असणारे कवी दादासाहेब कोते, नववीच्या पुस्तकात 'वनवासी' ही कविता असणारे तुकाराम धांडे, चौथीच्या बालभारतीमध्ये 'मला शिकायचंय' हा धडा असलेले लेखक आबा महाजन, सातवीच्या पुस्तकात 'स्वप्न विकणारा माणूस' हा धडा असणारे लेखक अशोक कोतवाल, चौथी इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकात 'स्वयंपाक' ही कविता असलेली कवी किशोर पाठक आणि प्रसिद्ध कवी दासू वैद्य या सर्व लेखक कवींनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत आपल्या कविताही सादर केल्या.