Breaking News

समाज ऋणातून उतराई होण्यासाठी प्रयत्नशील असावे- प्रकाश अडसुरे.


भाविनीमगाव/प्रतिनिधी /-."राष्ट्राय इदं न मम् "या भावनेतून समाज ऋणातून उतराई होण्यासाठी आपापल्या परीने सर्वानीच कसोशीने प्रयत्न करायला हवेत,तरच आपली प्रगती शक्य असल्याचे वक्तव्य औरंगाबाद येथील एस.एन.कन्स्ट्रक्शन चे व्यवस्थापक श्री.प्रकाशराव अडसुरे यांनी केले.

कौठा, येथील राजे संभाजी माध्यमिक विद्यालयात 69 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त नवनिर्वाचित सरपंच विजयाताई डाके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस पाटील होते.तर श्री.अडसुरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अडसुरे यांनी विद्यालयास LCD प्रोजेक्टर प्रदान करून प्रतिवर्षी 8 वी ते 10 वी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु.5000/- बक्षीसही जाहीर केले. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रसेवेबरोबरच आईवडिलांची निस्सिम सेवा करून आपल्या शाळेचे व गावाचे नाव उज्वल करावे. तसेच प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून समर्थ व बलशाली देश घडविण्यासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे.