Breaking News

९६ नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित, कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन !


शेवगांव/ प्रतिनिधी/- शेवगाव नगर परिषदेच्या ९६ कर्मचाऱ्यांची सेवा खंडित केल्यामुळे, शेवगाव नगरपरिषदेचे ९६ कर्मचारी सोमवार ,२९ जानेवारी रोजी शेवगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत.शेवगाव नगर परिषदेने कर्मचाऱ्यांना १९/१२/२०२७ रोजी कामावर हजर न राहण्याची जी नोटीस दिली आहे, ती नोटीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर अन्याय करणारी नोटीस असल्याचे कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे.
नगर परिषदेने औद्योगिक कायद्यानुसार दिली गेलेली नोटीस हि बेकायदेशीर असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.  शिवाय कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे. यासाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन होत आहे व यावरही न्याय न मिळाल्यास भारतीय कम्युनिस्ट पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने नगरपरिषद बंद करण्याचा निर्णय कामगार संघटना व सर्वपक्षीय नेत्यांनी घेण्याचे ठरवलेलं आहे.

दिल्या गेलेल्या नोटिशीचा संबंधित संस्थेने,सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर होणारा अन्याय थांबवावा, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. विजयकुमार बोरुडे, पवनकुमार साळवे,प्रकाश वाघमारे,सतीश पाटिल लांडे, यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते