Breaking News

पद्मावत प्रदर्शित झाला तर जौहर करु; क्षत्रिय समाजातील महिलांकडून इशारा

मुंबई :- पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली नाही तर आम्ही किल्ल्यात जौहर करू असा इशारा क्षत्रिय समाजाच्या महिलांनी दिला आहे. सर्व समाजाच्या बैठकीत सदस्यांनी या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला. या बैठकीत जवळपास 500 लोक सहभागी झाले होते. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आणखी एक संकट उभे राहिले आहे.


17 जानेवारीला चितौडगढ येथून जाणारे राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे मार्ग पूर्णपणे बंद करण्यात येतील. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन पूर्ण देशात ’पद्मावत’ चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करणार आहोत, असे राजपूत करणी सेनेचे विरेंद्र सिंह यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी पचपदरा गावात एका रिफायनरी प्रोजेक्टच्या उद्धाटनासाठी येणार आहेत त्यावेळी करणी सेनेचे काही सदस्य 16 जानेवारीला मोदींचीही भेट घेणार आहेत. इतके करूनही जर ’पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर 24 जानेवारीला क्षत्रिय समाजाच्या स्त्रिया किल्ल्यात जौहर करतील, असे त्यांनी सांगितले.