Breaking News

पाचशेच्या नोटेवरुन गांधीजी गायब


मुंबई,  दहिसर पूर्वेतील एक्सिस बँकेच्या एटीएममधून काढलेल्या पाचशेच्या नोटेवर गांधीजींचे छायाचित्र नसल्याची घटना घडली आहे. विवेक पांडे नावाच्या व्यक्तीने या एटीएममधून पाच हजार रुपये काढले. या नोटा मोजत असतांना पांडे यांच्या छायाचित्र नसल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने ती पाचशेची नोट एक्सिस बँकेत जमा केली.