Breaking News

ठाण्यात जिल्हा रुग्णालयातून बाळ पळविले


ठाणे, विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयातून अवघ्या चार तासांचे बाळ चोरीस गेल्याची घटना आज पहाटे घडकीस आली. याप्रकरणी बाळाची आई मोहिनी भोवर हिने ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.भिवंडीच्या आदिवासी पाड्यात राहणा-या मोहिनीने काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एका मुलाला जन्म दिला. पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान एका महिलेने बाळाच्या आजीने बाळाला मागितल्याचा बहाणा करून मूल तिच्याकडून नेले. मात्र, ही महिला परत न आल्याने त्या महिलेने बाळ चोरल्याचे लक्षात आले.