Breaking News

हक्काच्या पाण्याशिवाय भरभराट अशक्य : माजी आ. काळे


कोपरगाव ता. प्रतिनिधी :- यावर्षी वरुणराजाने कृपादृष्टी केल्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. खालची वरची धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे खाली पाणी सोडले जाणार नाही. गोदावरी कालव्यांना वेळेवर पाणी मिळणार आहे. तसेच उन्हाळ्यात सुद्धा शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. अशी सुखावह परिस्थिती असली तरी भविष्यात ही परिस्थिती अशीच राहील, याची शाश्वती नाही. त्यामुळे हक्काच्या पाण्याशिवाय गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची भरभराट होणे अशक्य आहे, असे प्रतिपादन माजी आमदार अशोक काळे यांनी केले. 
खिर्डी गणेश येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. माजी आ. अशोक काळे खिर्डी गणेश, येसगाव, नाटेगाव, ब्राम्हणगाव येथील कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी ते आले होते. ते म्हणाले, स्व. शंकरराव काळे साहेबांनी सुरु केलेली पाण्याची लढाई आपण सुप्रीम कोर्टात लढत आहोत. स्व. काळे साहेबांनी सुरु केलेली हक्काची पाण्याची लढाई मी प्राणपणाने लढलो. आता ही जबाबदारी आशुतोषने खांद्यावर घेतली आहे. माझ्यापेक्षा काकणभर जास्त त्याचे प्रयत्न सुरु आहेत. कोपरगाव तालुक्याचे सर्वच प्रश्न सोडविण्याची तळमळ पाहता आशुतोषच्या तुमचा खंबीर पाठींबा उभा करा. 

याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, काळे कारखान्याचे संचालक विठ्ठलराव आसने, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, भगवान माळी, गौतम बँकेचे संचालक नानासाहेब रोहोम, खिर्डी सोसायटीचे सदस्य साईनाथ रोहोम, नाना सोनवणे, वाल्मिक जगधने, केशव कु-हाडे, तुकाराम हुळेकर, सोमनाथ आंबिलवादे, संतोष भुजाडे, रावसाहेब मोरे, वसंतराव मोरे, किरण कुदळे, जालिंदर उळेकर, जयवंत मोरे, राजेंद्र निकोले, दिलीप गायकवाड, माणिक तेलंगे, गोरख म्हस्के, दादासाहेब पवार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.