Breaking News

इंधन चोरणारी परप्रांतीय टोळीस जेरबंद

संगमनेर/प्रतिनिधी :- तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात नाशिक पुणे महामार्गावरील एमआईडीसी परिसरात पोलिसांनी इंधन चोरणारी टोळी जेरबंद करण्यात यश मिळविले. शुक्रवारी मध्यरात्री अडीच तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. टँकरमधून फर्नेस ऑइल चोरी होत असल्याची माहिती नगर ग्रामीण सहाय्यक पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. 

पोलिसांनी आठ आरोपींना ऑइल टँकरमधून फर्नेस ऑइल चोरताना रंगेहाथ पकडले. पोलीस आल्याचे पाहून टँकरचालक आणि मुख्य आरोपी फरार झाले. या कारवाईत आठ आरोपींसह ८ टँकर, ऑइलसह ५८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी मसूकअली हसमुल्लाखान {रा. अमन पॅलेस, आयडियल मार्केट ठाणे}, मेहता आलम अदिल अहमद सिद्दीकी {रा. भाटपारा, तहसील बागनगर जि. संतकबीर उत्तरप्रदेश}, सद्दाम हुसेन फारुकखान {पाराबाजार, तहसील सुलतानपूर उत्तरप्रदेश}, करीम अब्दुल हारून साहिल {बालियापुर बागनगर जि. संतकबीर उत्तरप्रदेश} आदींसह ८ आरोपींना या कारवाईत जेरबंद करण्यात आले. स. पो. अधीक्षक मनीष कलवानीया आणि पो. नि. औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. राजपूत व फोजदार निकम हे करत आहेत.