Breaking News

कुंभार समाजातील भ्रष्टमती पुढार्‍यांचा अवतार संपतोय!


कुंभार समाजाला भ्रमीत करून 5 मार्चला समाजाचा मोर्चा काढण्याचा फास या मंडळींनी टाकला.हा मोर्चा कुंभाराची अस्मिता आहे,समाजाचा स्वाभीमान आहे.अशा वल्गना करून समाजाला जाळ्यात अडकावण्याचा डाव टाकला.तथापी त्यांच्या दुर्दैवाने या मंडळींचे डावपेच,कारनामे,फसवी निती जवळून पाहिलेल्या काही मंडळींनी मोर्चा मागचा हेतू ओळखून हा मोर्चा समाजाचा घात करणारा ठरू शकतो याविषयी समाजाता जागृती सुरू केली.आणि मोर्चात सहभागी होण्याच्या भुमिकेपासून समाज हळू हळू दुर जाऊ लागला.समाजाच्या भ्रष्टमती पुढार्यांचे चाळ्यांची इतीश्री करण्याचा निर्णय अखिल कुंभार समाजाने घेतल्या त्यांचा अवतार संपण्याच्या वाटेवर आहे.
एक माणूस किंवा चार डोक्यांची एखादी टोळी सदा सर्वकाळ एखाद्याला फसवू शकत नाही.आणि ही फसवणूक एखाद्या समुदायाशी किंवा समाज घटकाशी निगडीत असेल तर अशा टवाळखोर चीटर्सचे पितळ उघडे पडण्यास वेळ लागत नाही.कुंभार समाजातील अशा काही चिटर कंपनीच्या चेहर्यावरील बुरखा समाजातील तरूण पिढीने अक्षरशः फाडून काढला आहे.गेली अनेक वर्ष या टवाळखोर टोळीने स्वतःला समाजाचे नेते म्हणवून घेत समाजाची घोर फसवणूक करण्याचे उद्योग सुरू ठेवले आहेत.अनेक दिवस समाजाने या मंडळींचे हे कुट उद्योग सोसले.समाजाने दाखवलेल्या सहनशीलतेमुळे या मंडळींचे हे उद्योग पचले.अति तिथे माती होते हे वास्तव नाकारून आता कुठे तरी थांबायला हवे याचे भान त्यांनी ठेवले नाही.आपण समाजाला वेड्यात काढू शकतो ही त्यांची भावना पराकोटीला पोहचली.तोच त्यांचा अजेंडा बनला.म्हणतात ना फसवणूकीची रणनिती फार काळ यशस्वी होत नाही.समाजाच्या फसवणूकीसाठी टाकलेला फास ,फास टाकणार्या गळ्याभोवाती आवळला जाऊ शकतो.या चांडाळ चौकडीची अवस्थाही अशीच झाली आणि कुंभार समाजाला भ्रमीत करून 5 मार्चला समाजाचा मोर्चा काढण्याचा फास या मंडळींनी टाकला.हा मोर्चा कुंभाराची अस्मिता आहे,समाजाचा स्वाभीमान आहे.अशा वल्गना करून समाजाला जाळ्यात अडकावण्याचा डाव टाकला.
तथापी त्यांच्या दुर्दैवाने या मंडळींचे डावपेच,कारनामे,फसवी निती जवळून पाहिलेल्या काही मंडळींनी मोर्चा मागचा हेतू ओळखून हा मोर्चा समाजाचा घात करणारा ठरू शकतो याविषयी समाजाता जागृती सुरू केली.या मंडळींनी केलेले ऊद्योग समाजा समोर ठेवले,समाज खडबडून जागा झाला.विशेषतः कुंभार समाजातील तरूण या मंडळींचे उद्योगी चाळे पाहून अस्वस्थ झाले.मोर्चाच्या निमित्ताने कुंभार समाजाशी या तरूण पिढीने केलेल्या हितगुजातून या स्वघोषीत पुढारी चौकडीचे अनेक कारनामे चव्हाट्यावर आले.जळगावचे योगेश हिवरकर यांनी मिळवलेल्या माहितीतून या भ्रष्टमती पुढार्यांनी गरीब कुंभारालाही लुटल्याचे भयानक वास्तव उघड झाले आहे.अखिल कुंभार समाजाच्या माहितीस्तव योगेश हिवरकर यांनी या निमित्ताने व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दात मुद्दामहून प्रसिध्द करीत आहोत.

समाजातील खंडणीखोर पुढार्यांना बहिष्कृत करा
महाराष्ट्र राज्यातील कुंभार समाजाच्या 5 मार्च रोजी निघणार्‍या मोर्चाच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी काही विट व्यवसायिकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला असता मला धक्कादायक माहिती मिळाली आणि ती माहिती जाणून घेऊन मला खूप मोठा धक्काच बसला व खूप वाईट वाटले. कुंभार समाजाचा मुख्य व्यवसाय माती पासून वस्तू बनवून विक्री करून परीवाराची ऊपजिवीका त्यावर करणे. महाराष्ट्र राज्यात राहणार्‍या कुंभार समाजातील समाजबांधवांना त्यांच्या व्यावसायिक कामासाठी महाराष्ट्र सरकारने 500 ब्रास माती कोणत्याही प्रकारची अर्ज फी व स्वामित्त्व धन न घेता माफ केलेलीे असतानाही कुंभार समाजातील स्वतःला नेते म्हणून घेणारे ,काही सरकारी अधिकार्‍यांचे दलाल नेते गोर गरीब मातीपासून विटा बनविणार्‍या समाज बांधवांकडून पैसे वसूल करून अनेक वर्षांपासून सरकारी अधिकारी यांना देऊन त्यातील काही मलिदा स्वतःला ठेवत असल्याचे विट व्यवसाय करणार्‍या समाजबांधवांनी मला सांगितल आहेे. वाईट यासाठी वाटले की समाजातील गरीब बांधवांनी ज्यांच्याकडे दाद मागायची तेच जर दलाली करणार असतील तर कशाला हव्यात संघटना व कुंभार समाजाचे नेते मंडळी. ही मंडळी वेळोवेळी शासनाच्या विरोधात अंदोलने करतात त्या आंदोलनाला त्यांना घेऊन जाताना सांगतात की हा फलाना मंत्री येणार ते कुंभार समाजाला पूर्णपणे माती फुकट मिळवून देणार आहेत आंदोलन मोठे दिसण्यासाठी मुलाबाळासहीत जावे लागते आःदोलनाला खर्च करण्यसाठी वर्गणी मागुन घेतात अनेक वेळा आंदोलनाला जाऊनही काही फायदा झालेला नाही. पुन्हा 5 मार्चच्या मोर्चासाठी मुंबईला त्यांना येण्यासाठी सांगितले जात आहे. सध्या कामाचा सिजन आहे आत्ता काम केले तरच पुढील सहा महीने विटांची विक्री करून परिवाराचे पालनपोषण होणार असल्याचे त्यांनी मला सांगितले. मोर्चाला जाऊन जाऊन ते थकले आहेत. इच्छा नसताना जावे लागते नाही गेलो तर आपलेच नेते तलाठी यांना माती वाहतूक करणारे वाहन पकडून पाच दहा हजाराचा दंड भरायला लावतात. भिक नको पण कुत्रा आवर अशी आमची गमंत कुंभार समाजातील नेतेमंडळी यांनी विट व्यवसायिकांची करून ठेवली आहे. आमचा विषय त्यांनी सोडून दिला व आंदोलनापासून आम्हाला दूर ठेवले तर आमच्यावर त्यांचे उपकार होतील आम्हाला आमच्या आहे त्या हालतीवर सोडून दिले तर बरे होईल. मराठा समाजातील आमदार खासदार हे मराठा समाजासाठी काहीही करू शकले नाहीत तर कुंभार समाजातील आमदार खासदार झाल्यावर काय करणार उलट झाल्यास त्यांच्या भव्यदिव्य सत्कार करण्यासाठी घरातून वर्गणी दयावी लागेल. त्यामुळे ते आमदार खासदार न झालेलेच बरे राहील...! आमच्यासाठी कोणीही काही करू शकणार नाही कोणी करायला गेल्यास नेते त्याला करून देणार नाहीत. मागील वर्षी समाजाच्या काही नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली होती की मातीच्या विटांवर कायमची बंदी हटविण्यात यावी. मातीच्या विटा बंद होणार व औष्णिक वीज केंद्रातील राखेच्या विटाच बांधकामात वापरल्या जातील या भितीने आम्ही मातीच्या विटा बनविणारे पूर्णपणे घाबरून गेलो होतो. परिवाराची उपजिविका कशी करायची याचा आमच्या समोर मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. परंतु श्री.मनोहर जाधव या युवकाने मातीमध्ये 25% राखेचा वापर केल्यास ती विट शासकीय बांधकामात वापरता येईल व नुसती मातीपासून बनवलेली विट खाजगी बांधकामात वापरण्यासाठी शासनाची कोणतीही हरकत नसल्याचा केंद्रीय पर्यावरण विभागाचे शासन राज पत्र मिळून सर्व महाराष्ट्रभर पाठवून आम्हाला दिलासा दिला व त्या वेळेस नागपुर अधिवेशनावर काढणारे आंदोलन नेत्यांना काढता आले नाही. अशाप्रकारे नेतेच विट व्यावसायिकांना प्रश्‍न निर्माण करून वेठीला धरताना दिसत आहे. जे कुंभार समाजाचे ओळखपत्र फुकट मिळणार होते त्याचे नेते लोकांनी 3000 रुपये विट व्यवसायिकांकडून जबरदस्तीने घेतले गेले. त्यामुळे आजही समाजबांधव ओळखपत्र घेण्यापासून वंचित राहिला आहे. विट व्यवसायिकांची कोणतीही समस्या नेतेलोकांकडून सोडवली जात नाही. या सर्व प्रकारामुळे 5 मार्च रोजी होणार्‍या मोर्चाला विट व्यावसायिकांची मनापासून येण्याची इच्छा दिसत नाही असे त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांवरून लक्षात येत आहे. विट व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी खालील विट व्यवसायिकांची मो.नं. संपर्कासाठी देत आहे.

*1) श्री.बरदिया (बुलढाणा) :-9822236732
*2) श्री.मोरे (शहागड) :- 9763434418
*3) श्री.पेंढारकर(यवतमाळ) :-9763734748
*4) श्री.मछिंद्र (नांदेड) :- 9763739207
*5) श्री.खैरनार (नाशिक) :- 9604829967
*6) श्री.बाविस्कर (जळगाव) :-9923865266
*7) श्री.राजे(सातारा) :- 9890104105

टिप :- लिखाण करतांना कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास क्षमा असावी. परंतु मी जे काही सत्य पाहिले ते समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न यासाठी केला की पुढील काळात विट व्यवसायिकांच्या समस्या वाढणार आहेत. त्यांना खर्‍या मदत करणार्‍या नेत्यांची गरज आहे. मी केलेल्या लिखाणावर विट व्यवसायिकांनी चांगल्या वाईट प्रतिक्रिया देण्यास घाबरू नये. आपल्या प्रतिक्रियांतून खरे वास्तव कुंभार समाजासमोर येणार आहे.
आपला
योगेश हिवरकर
सामाजिक कार्यकर्ता
जळगाव