Breaking News

सलग दुस़र्‍या दिवशी शेअर बाजाराची उसळी

मुंबई : शेअर बाजाराने सलग दुस़र्‍या दिवशी इतिहास रचला आहे. गुरूवारी सकाळी शेअर बाजार सुरू होताच सुमारे 300 अंकाची उसळी घेत सेन्सेक्स आपल्या सर्वोच्च स्थानी पोहोचला. बुधवारी 35 हजारांची उसळी घेणाऱया सेन्सेक्सने आपला धडाका आजही कायम ठेवला. निफ्टीने शानदार तेजी दाखवत 10870 अंकाचा आकडा पार केला आहे.


गुरूवारी मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स 35.450ला सुरू झाला आणि पाहता पाहता 350 अंकाने तो मजबूत झाला. तिकडे बँकिंग शेअर्समधील तिहेरी शतकाच्या जोरावर निफ्टी पण 10.873 अंकावर सुरू झाला.9.33 वाजता बँक निफ्टीने 500 अंकाची उसळी घेतली. मिडकॅप इंडेक्समध्येही 140 पॉईंटची उसळी दिसून आली.