जामखेड / श. प्रतिनिधी :- देशाच्या प्रगतीत शहराबरोबरच खेड्यांचाही सहभाग आहे त्यामुळे शहराप्रमाणे खेड्यांचाही विकास होण्याच्या दृष्टीने शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून केवळ स्मार्ट सिटी नव्हे स्मार्ट खेडी बनविले पाहिजे. खेड्याकडे चला हे गांधीजींचे वाक्य हवेतच विरले आहे. त्यामुळे स्मार्ट सीटी ऐवजी स्मार्ट खेडी तयार करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आमदार, खासदार यांना ज्याप्रमाणे मानधन सवलती दिल्या जातात त्याप्रमाणे, सरपंचांनाही काही प्रमाणात मानधन मिळाले पाहिजेत असे मत अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी जामखेड येथील सरपंच मेळाव्यात व्यक्त केले. जामखेड येथे पंचायत राज विकास मंच व अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने सरपंचाचा मेळावा व नुतन जिल्हाध्यक्ष अजय काशिद यांचा सत्कार कार्यक्रमाचे जामखेड मधील गणेशबाग येथे दि. 18 जाने. रोजी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष दत्ता काकडे, महीला अघाडीच्या राज्यसंघटक व सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा, निशिगंधा माळी, उपमहाराष्ट्र केसरी, बबन काशिद, पश्चिम महाराष्ट्र संघटक संतोष दळवी, राज्य कार्यकारिणी सदस्य कैलास गोरे, प्रसिद्धी प्रमुख सूहास चव्हाण, मराठी भाषीय संघ, पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, जि. प. सदस्य सोमनाथ पाचारणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत मोरे, मा. सभापती डॉ. भगवान मुरूमकर, भाजपा तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, सोमनाथ राळेभात, उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, बाजार समितीचे संचालक सुभाष जायभाय, सरपंच विद्या मोहळकर यांच्यासह तालुक्यातील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्मार्ट सीटी ऐवजी स्मार्ट खेडी तयार करावी - जयंत पाटील
Reviewed by Dainik Lokmanthan
on
08:46
Rating: 5