नवी दिल्ली : बॉलिवूडचा वादात असलेला बहुचर्चीत पद्मावत सिनेमा अखेर वादाच्या भोवर्यातून सुटला असून, सर्वोच्च न्यायालयाने पद्मावत सिनेमावर मोठा निर्णय दिला आहे. चारही राज्यात पद्मावर सिनेमा रिलीज होणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जाहिर केला आहे. संजय लिला भन्साली यांच्या पद्मावत सिनेमावर राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि हरियाणा सरकारनं बंदी घातली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली आहे. या आधी मुख्यमंत्री वसुंधरा राजे त्याचबरोबर माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी पद्मावत सिनेमावर पत्रही लिहले होते. ‘जोपर्यंत या सिनेमात आवश्यक बदल केले जात नाही तोपर्यंत हा सिनेमा रिलीज केला जावू नये’ असा या पत्राद्वारे आग्रह करण्यात आला होता. या सगळ्या विरोधामुळे या सिनेमाचे नाव बदलण्यात आले, तसेच 26 दृश्यांना कात्री लावण्याची तयारी दाखवण्यात आली होती. सेन्सॉर बोर्डाची अग्निपरीक्षा पार केली आणि आता अखेर जावून या सिनेमावर बंदी उठवण्यात आली आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर चार राज्यांतून काय प्रतिक्रिया उमटतील यावरही सगळ्यांचे लक्ष आहे.
पद्मावत सिनेमाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:48
Rating: 5