Breaking News

शेतीपयोगी माहिती देणारे अ‍ॅप्लिकेशन


पाथर्डी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकर्‍यांना दर्जेदार उत्पन्नसाठी कोणती बियाणे, खते वापरावीत यासंबधी अनेक प्रश्‍न पडतात. तसेच शासनाच्या कोणत्या योजना असतात. शेती व्यवसाय करताना शेतीपूरक सेवा पुरवणार्‍याची माहिती, प्रक्रिया उदयोग, जोडधंदे असे अनेक प्रश्‍नावर त्यांना समाधानकारक माहिती व उत्तरे मिळत नाहीत, त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करणारी सक्षम यंत्रणा उपलब्ध व्हावी यासाठी त्यांच्या फोनवर सर्व माहिती मिळण्यासाठी शेतकरी मित्र हे अ‍ॅप्स महाराष्ट्रामध्ये काम करत असून, पाथर्डी तालुक्यातील शेतकर्‍याला आधुनिक शेतीतून प्रगतीचा मार्ग दाखवण्याचा मानस शेतकरी मित्रचे संस्थापक नाना वारंगुळे यांनी व्यक्त केला, तर या अ‍ॅपचे नोंदणी आणि अधिक माहितीसाठी अशापुरा कम्युनिकेशन सम्पर्क साधावा. त्यांनी या अ‍ॅपबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, या अ‍ॅपने 20 हजाराचा टप्पा गाठला असुन, शेतीपयोगी सर्व माहिती मिळत असल्याने स्वतःहून शेतकरी जोडले जात आहेत. उद्योजकांना या अ‍ॅपमुळे एक मंच उपलब्ध झाला आहे. स्वतंत्र विक्री किंवा विणपन (मार्केटिंग) कर्मचारी नेमण्याची क्षमता नसल्याने छोट्या उद्योगासाठी शेतकरी मित्र हा एक उत्तम जाहिरातीचे माध्यम ठरत आहे. त्यांतून ही कंपनी सदस्यत्वासाठी कोणतेही शुल्क आकारत नसल्याचे सदस्य नाना शिंदे यांनी स्पष्ट केले.