Breaking News

प्रश्‍न शोधण्याची गरज लागली नाही ः सुजय विखे


पाथर्डी हा ऊसतोड कामगारांचा, कष्टकर्‍यांचा, दुष्काळी अवर्षणग्रस्त तालुका आहे. तालुक्यातील जनतेचे प्रश्‍न मागील पंधरा वर्षापासून जसेच्या तसेच आहेत, त्यामुळे पाथर्डी तालुक्याचे प्रश्‍न शोधण्याची गरज कधी भासली नसल्याचे प्रतिपादन सुजय विखे यांनी पाथर्डी येथे बाबूजी आव्हाड महाविद्यालयास सदिच्छा भेटी दरम्यान केले. यावेळी विखे यांनी स्वर्गीय बाबूजी आव्हाड व स्वर्गीय बाळासाहेब विखे यांच्यातील, असलेल्या मैत्रीच्या नात्याचाही त्यांनी उल्लेख केला. यापुढे तालुक्यातील सर्व प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू असेही ते म्हणाले. यावेळी पार्थ विद्या प्रसारक मंडळ व बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या वतीने सुजय विखे यांचा सत्कार पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी केला. यावेळी अभय आव्हाड यांनी सुजय विखे पाटील हे अहमदनगर जिल्ह्यातील युवा नेतृत्व आहेत, युवकांना व तरुणांना दिशा देण्याचं काम त्यांच्या हातून घडत आहे, असे मत व्यक्त करत त्यांना भावी राजकीय वाटचालीस शुभेच्या दिल्या. या कार्यक्रमाप्रसंगी राहुल करखेले, संभाजी वाघ, किशोर परदेशी, दत्ता सोनटक्के, ज्ञानेश्‍वर कोकाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, उपप्राचार्य डॉ. एस. बी. चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमेश मोरगावकर यांनी तर आभार प्रा. बबन चौरे यांनी मानले.