Breaking News

वाहतुक कोंडीमुळे नागरिकांची असुविधा


कर्जत शहराच्या मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहतुक कोंडी होत असुनही, पोलीस निरीक्षक वसंत भोये याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. कर्जत शहराचा मुख्य रस्ता आहे, याशिवाय रस्त्यावर एस. टी बसस्थानक, दादा पाटील महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, कन्या विद्यालय, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, ग्रामीण रूग्णालय, सार्वजनीक बांधकाम कार्यालय, प्रांत कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय या शिवाय कर्जतची मुख्य बाजार पेठ आहे. याशिवाय रहदारीचा प्रमुख रस्ता असुनही पोलीस याकडे कानडोळा करत असल्याने, हे मात्र न सुटणारे कोडे आहे. या रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणावर रहदारी असते, परिणामी या रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी सतत होत असते. या वाहतुक कोंडीमुळे वाहनचालक आणि नागरीकांमध्ये हुमरीतुमरी, वादावागी सातत्याने होत असते. या रस्त्यावर सतत वर्दळ असल्यामुळे वाहनांच्या गोंधळ, गोंगाटामुळे रस्त्यावरील दुकानदार वैतागले आहेत, या रस्त्यावरील तसेच चौकाचौकात कायम वाहतुक कोंडी होऊन, वाहनधारकांमध्ये असुविधेचे प्रमाण वाढले आहे. शाळा, महाविद्यालये सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना पायी चालणे कठीण होवून बसते, या भागात वाहतुक कोंडीमुळे एखादी दुर्घटना घडण्यापुर्वीच पोलीस निरीक्षक भोये आणि सार्वजनीक बांधकामचे भोसले यानी हातावर हात घालुन न बसता त्वरीत उपाययोजना करणे आवश्यक आहे.