Breaking News

जि. प. शाळेत विद्यार्थ्यांनी भरवला भाजीपाला बाजार


जामखेड / श. प्रतिनिधी :-  प. प्रा. शाळा फक्राबाद केंद्र अरणगाव ता. जामखेड येथे शाळेच्या विद्यार्थ्यांचा भाजीपाला बाजार, आनंदी बाजार भरवला होता. या बाजारास पालकांसह विद्यार्थ्यांंनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. या बाजारास माजी जि. प. सदस्य विश्‍ननाथ राऊत, सरपंच दिगांबर जगताप, व्यवस्थापन समिती अध्यक्ष रतन तुपेर, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक राम निकम , आनखेरिदेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक महाजन, सर्व शिक्षक विद्यार्थी तसेच संतोष राऊत, संजय घोड़के, संतोष वाघ, शेखर घुमरे, दत्ता होनमाने, विकास बगाडे, महादेव हजारे, मोहसिन सय्यद, संतोष ससाणे, दिपक मोहळकर, आदिंनी भेट देऊन भाजीपाला खरेदी करून विद्यार्थ्यांंच्या या कलागुणांचे कौतुक केले, विद्यार्थ्यांनी एकूण 55 भाजीपाला स्टॉल, 12 खाद्यपदार्थ स्टॉल, दोन हॉटेलचे दूकान लावण्यात आले होते, या बाजारात एकूण 9700 रुपयांची उलाढाल करण्यात आली, या बाजारातून भाजीपाला विकून आलेल्या नफ्याच्या पैशाचा आनंद विद्यार्थयाच्या चेहर्‍यावर दिसून येत होता, पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष स्वतः उपक्रमात सहभागी होने, स्वतः कृती करणे, व्यवहार ज्ञान वाढीस लागणे, खरेदी, विक्री, नफा तोटा यांची माहिती यातून विद्यार्थ्यांना झाली, तसेच समाजात मिसळून शाळा, समाज यांची समरसता वाढीस लागली असे शाळेतील सर्व शिक्षकांनी सांगितले, कार्यक्रमाच्या यशश्‍वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक राम निकम, गौतम सोले, कांतिराम बरडे, प्रवीण शिंदे, जयश्री पाटील, सरस्वती माने, मीरा डमाळे आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात गट शिक्षणाधिकारी पोपट काळे, केंद्रप्रमुख सुरेश कुंभार यांनी मार्गदर्शन केले.