रस्तालूट करणाऱ्या टोळ्या गजाआड
यापैकी एका घटनेत नाशिक जिल्ह्यातील साईनाथ माधव जाधव हे दि. १२ जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून राहुरीकडून नगरकडे जात होते. धामोरी शिवारातील काका तांबे पेट्रोल पंपासमोरुन दोन मोटरसायकलवर पाठलाग करत आलेल्या मयूर दत्तात्रय कदम रा. बारागाव नांदूर}, प्रकाश बाळासाहेब जगताप {रा. जुना कनगर रोड, राहुरी}, आकाश तात्यासाहेब शेडगे {रा. जुना कनगर रोड राहुरी}, प्रकाश उर्फ किसन बाळासाहेब म्हस्के {रा. नगरपालिका काॅलनी राहुरी}, अक्षय मधुकर शिरसाठ {रा. देसवंडी}, अविनाश श्रीधर साळवे {रा. डिग्रस} या सहा जणांनी साईनाथ जाधव यांना रस्त्यात चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम आणि एचटीसी कंपनीचा मोबाइल असा एकूण ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. तांबे पेट्रोल पंपासमोर हा गुन्हा घडला. या सर्वच घटना पेट्रोलपंपावर लावलेल्या सी सी टि व्हि कॅमेरेत कैद झाल्या होत्या. पो. नि. प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिसांची ही मोठी कामगिरी आहे. गेल्या वर्षातही राहुरी पोलिसांनी रस्तेलूट करणाऱ्या टोळ्या जेरबंद केल्या होत्या.