सोनईच्या ‘त्या’ दुकानदारामागे लागली साडेसाती! ‘नार्को’ च्या अर्जाची एसपींनी घेतली दखल
नोटबंदीच्या काळात विविध लोकांच्या बँक खात्यावर पैसे टाकून ‘काळ्याचे पांढरे’ करणाऱ्या या दुकानदाराविषयी भुसारी यांनी दि. ६ डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनात या दुकानदाराचे ‘नौरंग’ पोलीस यंत्रणेच्या निदर्शनास आणून दिले होते. यात म्हटले होते, की या दुकानदाराने नोटबंदीच्या काळात कोणाकोणाच्या बँक खात्यावर कोणकोणत्या राष्ट्रियीकृत बँकांमध्ये प्रत्येकी किती पैसे टाकले, बेकायदा सावकारीच्या माध्यमातून किती जणांना गंडविले, कोणाच्या जमिनी लाटल्या, याविषयी सखोल चैकशी करण्यात यावी. सोनईच्या मुख्य पेठेतील या दुकानात कामावर प्रत्यक्षात किती कामगार आहेत, त्यांना किती पगार दिला जातो, या दुकानात महिला कामगारांसाठी किती ठिकाणी प्रसाधनगृहे आहेत त्याचप्रमाणे कर्जत तालुक्यातील राशीनच्या दुकानदाराबरोबर नक्की काय तडजोड झाली या सर्वच बाबींची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
ज्या व्यक्तींच्या नावे पैसे टाकण्यात आले होते, त्यामध्ये एक वाहनचालक, एक ठेकेदार कम कार्यकर्ता, एक स्वयंघोषित हभप ‘महाराज’ अशा अनेकांचा समावेश आहे. या लोकांच्या बँक खात्यात नोव्हेंबर २०१६ या एका दिवसात किंवा एकाच महिन्यात एवढी उलाढाली कशी झाली, या लोकांची उत्पन्नाची साधने काय आहेत, आदींविषयीचे सत्य जनतेसमोर येणे आवश्यक आहे. यासाठी भुसारींचा पोलीस यंत्रणेकडे सातत्याने आहे.
