Breaking News

महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणार - सुरेखा सांगळे


अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांना शहरासह उपनगरात अनेक प्रश्‍नांना सामोरे जावे लागत आहे. महिलांच्या प्रश्‍नांना प्राधान्य देवून, संघटनेच्या वतीने काम चालू आहे. यापुढे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणार असे प्रतिपादन अ.भा. छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा सांगळे यांनी केले. सावेडी येथे अ.भा. छावा संघटनेच्या पहिल्या महिला शाखेचे उद्घाटन सांगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी मंजुताई बागडे, शहराध्यक्षा संगिता शर्मा, पुष्पाताई कदम, शाखेच्या अध्यक्षा लक्ष्मी मुनोत, उपाध्यक्षा मिनाक्षी लिघुरे, अंजली भंगाळे, शाहुराजा शर्मा, मनिषा सोळसे आदिंसह परिसरातील महिला उपस्थित होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या महिलांना संरक्षण देवून, त्यांच्या सक्षमीकरणाच्या हेतूने या शाखेची स्थापना करण्यात आली आहे. सावेडी उपनगरात महिलांची होणारी छेडछाड, मंगळसुत्र चोर तसेच महिलांवर होणार्‍या अन्याय, अत्याचाराचा बिमोड करण्यासाठी सर्व महिला एकत्रित येवून कार्य करणार आहे. तसेच सामाजिक प्रश्‍नासह नागरी समस्या सोडविण्यासाठी देखील महिलांचा पुढाकार राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.