Breaking News

नरशार्दुल राजा संभाजी महानाट्य पहाण्याचे अपील


कर्जत/प्रतिनिधी/- शिवजयंती उत्सव सन २०१८ निमित्त कर्जत येथे दि .१०, ११ , १२ फेब्रुवारी २०१८ रोजी आयोजित नरशार्दुल राजा संभाजी या महानाट्याच्या प्रचार व प्रसारासाठी या महानाट्याचे लेखक मा . इंद्रजीत सावंत , निर्माते मा .किरण सिंह चव्हाण व संभाजीराजांची महान भुमिका साकारणारे प्रमुख कलाकार हर्षल सुर्वे या सर्व मान्यवरांचे आज कर्जत नगरी मध्ये आगमन झाले .
येथील आयोजक युवकांनी त्यांचे उत्स्फुर्त स्वागत केले . दुपारी १२ .०० वाजता कर्जत येथील शिवाजी चौकात त्यांनी मॉक शो घेतला . त्यामध्ये त्यांनी संभाजी राजांचा खोटा व चुकीचा इतिहास संशोधन करून तो पुसण्याचे काम व खरा इतिहास जनते समोर आणन्यासाठी या महानाट्याची निर्मिती केली असल्याचे सांगीतले . असे महानाट्य आपल्या शहरामध्ये सादर होत आहे . ते पहाण्यासाठी आपण सर्वांनी या असे आवाहन त्यांनी केले .