Breaking News

ग्रामीण पत्रकारामुळेच तळागाळातील प्रश्नाला वाचा फुटते - प्रांताधिकारी बांदल


भाविनीमगाव/ वार्ताहर/- महाराष्ट्र राज्य ग्रामीण पञकार संघटनेचे काम कौतुकास्पद असून संघटना विविध प्रशासकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात चांगले कार्य करत असून ग्रामीण पत्रकारामुळेच तळागाळातील सामाजिक प्रश्नाला वाचा फुटते असे वक्तव्य शेवगाव-पाथर्डीचे प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांनी केले. 
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच प्रांताधिकारी बांदल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शेवगाव विभागाचे पोलीस उप अधिक्षक अभिजित शिवथरे म्हणाले की, पत्रकारांची लेखनीमध्ये मोठी ताकद असून त्यांच्यामुळे अनेक प्रश्न प्रशासनाला माहीत होतात. तर काही गुन्ह्यामध्ये तपासाला मदत होते.

संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, सचिव अनिल कोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन पाथर्डी येथे उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी, विक्रमसिंह बांदल,शेवगांव पोलीस विभागीय कार्यालयात उपअधिक्षक अभिजीत शिवथरे तर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ,व भातकुडगाव मंडल कार्यलयात सर्कल लवांडे, कामगार तलाठी सी.ए.गडकर,रमेश सावंत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष संजय कोळगे, ताहेर पटेल, माणिक म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले.