Breaking News

अज्ञात इसमाने पेटवून दिले जंगल


जामखेड /प्रतिनिधी/- तालुक्यातील हसनाबाद ( पिंपरखेड ) येथील जंगल अज्ञात इसमाने पेटवल्याने ७ हेक्टर ७६ आर, जमिनी वरील हिरवेगार झाडे पुर्ण जळून झाले खाक झाले आहे. दि. 21 जानेवारी रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटना अधिकची माहीती अशी की, पिंपरखेड हसनाबाद येथील गट नंबर ७६ मध्ये सामाजीक वनीकरणाने ७ हेक्टर ७६ आर क्षेत्रात झाडे लागवड केली होती. या क्षेत्रातील झाडे मोठे झाल्या नंतर सामाजीक वनीकरन खात्याने पिंपरखेड ग्रामपंचायतीकडे देखभालीसाठी हे क्षेत्र वर्ग केले होते . परंतु ग्रामपंचायतीने या फाँरीस्टकडे दुर्लक्ष केल्याने यातील मोठ मोठ्या झाडांची तोड मोठ्या प्रमाणात होत आहे. या कडे कोणताही आधिकारी- कर्मचारी लक्ष देत नाहीत. मात्र दि २१ जानेवारी रोजी तर पुर्ण फाँरेस्ट अज्ञात इसमाने पेटवून दिले आहे. यावेळी आगीने रुद्र रुप धारण केले होते. हा वणवा विझविण्यास पाण्याचे जवळ कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने शेतकरी हतबल झाले होते. ही मोठी दुर्घटना घडली असताना सुध्दा या फाँरेस्टाकडे वनविभाग, तहसील, ग्रामपंचायतीचे कोणतेही अधिकारी फिरकलेच नाहीत. 
शेजारील शेतकऱ्यांनी वनीकरण विभागाशी संर्पक केला असता त्यांनी अंग झटकले. हे फाँरीस्ट ग्रामपंचायतीच्या ताब्यात असल्याने आम्ही काहीच करू शकत नाहीत असे उत्तर दिले. अशा अधिकाऱ्याला तातडीने कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली आहे, झाडे जगवा आणि झाडे लावा पर्यावरण वाढवा हे ब्रीद वाक्य तर हवेतच हे फाँरेस्ट जळत असताना सर्व संबंधित कर्मचारी वर्गाला शेतकऱ्यांनी संपर्क केला. परंतु त्या ठिकाणी कोणतीच मदत वेळेत मिळाली नसल्याने सर्व फाँरेस्ट जळून गेले. या मध्ये प्राणी ,पशु पक्षी जळून खाक झाले आहेत. या घटने विषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. या जळीताची चौकशी करून अज्ञात इसमा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.