कोपरगाव ता. प्रतिनिधी :- कोपरगाव शहरातील गोदावरी नदीवरील लहान पुलापासून ते शुक्लेश्वर मंदिर रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशा आशयाचे निवेदन कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने नगराध्क्ष विजय वहाडणे यांना देण्यात आले. कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरील लहान पुलापासून ते बेट भागातील शुकलेश्वर मंदिरापर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. शहरात येण्याचा जवळचा व कमी गर्दीचा मार्ग म्हणून या रस्त्याने नेहमीच वाहनचालकांची वर्दळ दिवसभर सुरूच असते. शेजारीच उच्च माध्यमिक महाविद्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांना या खराब रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. शुकलेश्वर मंदिर व संत जनार्दन स्वामी भक्तांची या रस्त्याने सतत ये-जा असते. हा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे छोट्या मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, सचिन परदेशी, नगरसेवक संदीप वर्पे, विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, नगरसेविका प्रतिभा शिलेदार, माधवी वाकचौरे, नवाज कुरेशी, सुनील शिलेदार, वाल्मिक लाहीरे, रमेश गवळी, सचिन परदेशी, हिरामण गंगुले, मुकुंद इंगळे, सूर्यकांत शिंदे, रावसाहेब साठे, निखिल डांगे, शिवा लकारे, संतोष शेलार, विकास बेद्रे, चंद्रशेखर म्हस्के, एकनाथ गंगूले, गणेश लकारे, संतोष टोरपे, चांदभाई पठाण आदींसह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोदावरी नदी ते शुक्लेश्वर मंदिर रस्ता दुरुस्त करा कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:24
Rating: 5